शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

..तर भाजपच्या विरोधात मतदान, ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 15:44 IST

सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल

सांगली : निवृत्तिवेतनधारक ही एक सामाजिक शक्ती बनली आहे. सरकारने निवृत्तिवेतन दिले नाही, तर भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा ईपीएस निवृत्तिवेतनधारकांच्या अधिवेशनात देण्यात आला.अखिल भारतीय समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन शेगावमध्ये झाले. केंद्र शासनाच्या पेन्शनरविरोधी धोरणांविरोधात तीव्र संघर्षाचा ठराव करण्यात आला. ‘जो पेन्शन का काम ना करे, वह सरकार बदलनी है’ अशा घोषणांनी अधिवेशन दणाणून गेले.केरळचे प्रतिनिधी एम. धर्माजन अध्यक्षस्थानी होते. भविष्य निर्वाह निधी सेलचे सदस्य सुकुमार दामले यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले की, सरकार उद्योगपतींवर सवलतींचा वर्षाव करत आहे. पण, सर्वसामान्यांच्या छोट्याछोट्या गरजांसाठीसुद्धा पैसा नाही.ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष उदय भट यांनी सरकारच्या नीती-धोरणांवर हल्लाबोल केला. सरकार घटनेतील समता व बंधुभाव यांच्या विरोधात असल्याने लोकशाही संकटात असल्याचे सांगितले.इंटकचे श्याम काळे यांनी सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगितले. अतुल दिघे यांनी ठराव मांडला. सरकारवर दबाव वाढविण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा निर्णय झाला.अधिवेशनासाठी देशभरातून सदस्य सहभागी होते. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी एम. एन. रेड्डी, एम. धर्मजन व महासचिवपदी अतुल दिघे यांना निवडण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा