शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

..मग रेडीरेकनर ठरणार कसा?; पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती ठरणार वादाची चिन्हे 

By संतोष भिसे | Updated: June 19, 2023 13:54 IST

मूल्यांकनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच

सांगली : महामार्गासाठीच्या भूसंपादनावेळी मागील दोन-तीन वर्षांतील रेडीरेकनरचे दर पाहून संबंधित भागातील जमिनींचे भाव ठरवले जातात. पण गेल्या तीन वर्षांत कोरोनामुळे जमिनींचे व्यवहारच झाले नाहीत, त्यामुळे रेडीरेकनर ठरवणार कसा? असा प्रश्न पुढे आला आहे. पुणे-बंगळुरु हरित महामार्गासाठी जमिनीच्या किंमती निश्चित करताना हा प्रश्न अधिक टोकदार होणार आहे.हरित महामार्गासाठी जिल्ह्यात सध्या भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे. प्रतिएकरी एक कोटी रुपये मिळावेत यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. अशीच स्थिती सूरत - चेन्नई हरित महामार्गाच्या भूसंपादनामध्ये निर्माण झाली आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन तालुक्यांतून तो जातो. तेथील शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदल्याची चिन्हे असल्याने ते आक्रमक झाले आहेत.यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जमिनीसाठी रेडीरेकनरच्या चारपट मोबदला देऊ, पण त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने रेडीरेकनर निश्चित करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला केली.मुख्यमंत्र्यांची हीच सूचना सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांनाही लागू होणार आहे. रेडीरेकनरच्या चारपटींपर्यंत मोबदला मिळायचा असेल, तर या जिल्ह्यांतील रेडीरेकनर निश्चित व्हायला हवा. कोरोनामध्ये सन २०२०, २०२१ या दोन वर्षांत जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होते. सन २०२२ मध्ये पूर्ण क्षमतेने झाले नाहीत. या स्थितीत रेडीरेकनर ठरवायचा कसा? हा प्रश्न आहे.शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमवेत साधकबाधक चर्चा करुनच मार्ग काढावा लागणार आहे. किंमती जाहीर केल्याशिवाय महामार्गाला एक इंचही जमीन देणार नाही असे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन मूल्यांकन निश्चित करावे लागेल. त्यावेळी रेडीरेकनरचा मुद्दा वादाचा ठरण्याची चिन्हे आहेत.

मूल्यांकनाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाचदरम्यान, सूरत-चेन्नई महामार्गासाठी सध्या अत्यल्पमोबदला दिला जात आहे. बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वाढीव भरपाईसाठी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यावेळी गडकरी यांनी स्पष्ट केले की, तुमच्या जिल्ह्यातील जमिनींचा रेडीरेकनर अथवा दर निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच आहेत. त्यामुळे भरपाईचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेBengaluruबेंगळूरhighwayमहामार्ग