शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आरफळ कालव्यामध्ये पडून सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:04 IST

सहा कि.मी.वर सापडला मृतदेह

विटा (जि. सांगली) : आळसंद (ता.खानापूर) येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा वर्षाच्या बालकाचा आरफळ कालव्याच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्यचाया सुमारास घडली. दरम्यान, शोधमोहिमेनंतर सहा कि. मी. अंतरावर आरफळच्या कालव्यात राजवीर याचा मृतदेह सापडला.आळसंद येथील राजवीर जाधव हा सहा वर्षाचा मुलगा विटा ते कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावरील रस्त्याने निघाला होता. त्यावेळी तो कालव्याच्या पुलावरून आरफळचे पाणी पहात असताना त्याचा तोल गेल्याने तो वाहत्या पाण्यात पडला. कालव्यातील वाहत्या पाण्याला वेग असल्याने काही क्षणातच तो दिसेनासा झाला.त्यावेळी ही घटना काही महिलांनी पाहिली. महिलांनी आरडाओरड केली. परंतु, त्या ठिकाणी कोणीही पुरूष नसल्याने राजवीर याला वाचविता आले नाही. मात्र, या घटनेची माहिती गावातील स्थानिक ग्रामस्थांना समजताच सर्वांनी आरफळ कालव्यावर गर्दी केली. त्यातील काही जणांनी पाण्यात उड्या घेऊन राजवीर याची शोधमोहीम सुरू केली.परंतु, उशिरापर्यंत राजवीर याचा शोध लागला नाही. त्यानंतर तब्बल ६ कि. मी. अंतरावर राजवीर याचा मृतदेह ग्रामस्थांना पाण्यात दिसला. या घटनेने राजवीर याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर हा जिल्हा परिषद शाळेतील इ. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो अत्यंत गुणी, होतकरू व हुशार आणि शाळेचा लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.आरफळमध्ये ७ जणांनी गमावला जीव...आळसंद गावापासून गेलेल्या आरफळ कालव्यात गेल्या काही वर्षापासून अशा अनेक घटना घडत आहेत. या ठिकाणी तीन ते चार लहान मुले, दोन महिला व एक पुरूष अशा ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आळसंद गावाशेजारून गेलेल्या आरफळ कालव्यात अशा  दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Six-Year-Old Dies After Falling into Arafaal Canal

Web Summary : A six-year-old boy from Aalsand tragically died after falling into the Arafaal canal near Vita, Sangli. Rajveer Jadhav fell while looking at the water and was swept away. His body was found 6 km away. Seven lives have been lost in the canal, prompting calls for safety measures.