इस्लामपुरात बारमधून सहा हजारांची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:31+5:302020-12-08T04:24:31+5:30

इस्लामपूर : येथील बसस्थानक परिसरातील एका बिअरबारमध्ये मद्यपान करून तेथील व्यवस्थापकास धक्काबुक्की करत बारच्या काऊंटरमधील सहा हजार रुपयांची रोकड ...

Six thousand cash was looted from a bar in Islampur | इस्लामपुरात बारमधून सहा हजारांची रोकड लुटली

इस्लामपुरात बारमधून सहा हजारांची रोकड लुटली

इस्लामपूर : येथील बसस्थानक परिसरातील एका बिअरबारमध्ये मद्यपान करून तेथील व्यवस्थापकास धक्काबुक्की करत बारच्या काऊंटरमधील सहा हजार रुपयांची रोकड एकाने लुटली. व्यवस्थापकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, धक्का देऊन या मद्यपीने पोबारा केला.

हेमंत जयवंत जाधव (रा. जुनी भाजी मंडई) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारचे व्यवस्थापक विकास शंकर मोटे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

जाधव आणि मोटे हे दोघे एकाच गल्लीत राहतात. रविवारी रात्री हेमंत जाधव हा बारमध्ये मद्यपान करण्यासाठी आला. २५५ रुपयांचे बिल झाल्याचे सांगताच त्याने बिल देण्यास नकार दिला. आता माझ्याकडे पैसे नाहीत. बिल नंतर देतो, कोठे पळून चाललोय काय, असे म्हणून मोटे यांच्याशी वाद घातला. यावेळी बारमध्ये असलेल्या इतर दोघांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही हेमंत जाधव याने शिवीगाळ केली. त्यानंतर जबरदस्तीने बारमधील काऊंटर उघडून त्यातील सहा हजार रुपयांची रोकड घेत जाधव याने पलायन केले.

Web Title: Six thousand cash was looted from a bar in Islampur