जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

By घनशाम नवाथे | Updated: April 28, 2025 22:37 IST2025-04-28T22:32:22+5:302025-04-28T22:37:26+5:30

राज्य पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एकूण ८०० जणांना सन्मानचिन्ह जाहीर

Six people from Sangli district police force awarded Director General Medal; Award ceremony on May 1 | जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: सहा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. मोटार परिवहन विभागातील सहायक फौजदार राजेंद्र पवार यांना अपघात न करता २० वर्षांची कारकीर्द उत्तम ठेवल्याबद्दल सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार अनिल कोळेकर यांनी म्हैसाळ येथील हत्याकांड प्रकरणातील तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सेवेत १५ वर्षे उत्तम रेकॉर्ड ठेवल्याबद्दल इस्लामपूर ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे, मिरज ग्रामीणचे हवालदार श्यामकुमार साळुंखे, विटा पोलिस ठाण्याचे हवालदार आनंदराव पाटील यांच्यासह पोलिस मुख्यालयातील राष्ट्रीय खेळाडू विकी जांगळे या सहा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

राज्य पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा ८०० जणांना सन्मानचिन्ह जाहीर केले. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी अभिनंदन केले. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सहा कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे.

Web Title: Six people from Sangli district police force awarded Director General Medal; Award ceremony on May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस