भाजपच्या बैठकीत सहा नगरसेवकांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:25 AM2021-03-15T04:25:46+5:302021-03-15T04:25:46+5:30

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी गद्दारी करत विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांना मदत करणाऱ्या नगरसेवकांचा निषेध रविवारी ...

Six corporators protest in BJP meeting | भाजपच्या बैठकीत सहा नगरसेवकांचा निषेध

भाजपच्या बैठकीत सहा नगरसेवकांचा निषेध

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी गद्दारी करत विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांना मदत करणाऱ्या नगरसेवकांचा निषेध रविवारी भाजपच्या ऑनलाईन बैठकीत करण्यात आला.

शहर जिल्हा भाजप कार्यकारिणीची रविवारी व्हर्चुअल बैठक झाली. अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे होते. आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, नीता केळकर, शेखर इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडीचा विषय चर्चेत आला. यावेळी पदाधिकारी, नेत्यांनी संबंधित नगरसेवकांवर कारवाईची मागणी करीत त्यांच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. विधिमंडळ अधिवेशनातील आक्रमक कामगिरीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

महापालिकेचे गटनेते आणि सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांचा तसेच घोडेबाजार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या निषेधाचा ठराव मांडला. यावर जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले, संबंधित नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी पक्षामार्फत कठोर पावले उचलण्यात येतील. त्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरचिटणीस मोहन वाटवे यांनी कोरोनाकाळात मोदी सरकारने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.

सरचिटणीस केदार खाडीलकर यांनी सर्व बाजूने महाराष्ट्राला संकटात टाकणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेधाचा ठराव मांडला. करोना काळातील राज्य सरकारची सुमार कामगिरी, राज्यपालांचा अपमान, महिलांवरील वाढते अत्याचार आदी विषयांचा समावेश होता. तसेच रामभक्तांना केलेली अटक, शेतकऱ्यांची फसवणूक, मराठा आरक्षणाचा केलेला खेळखंडोबा, वीजबिलांच्या बाबतीत लोकांची केलेली फसवणूक याप्रश्नी राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

दीपक माने यांनी स्वागत केले. दीपक शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांतील भाजपच्या कामगिरीची माहिती दिली. युवा मोर्चाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती शिंदे यांनीही आपल्या कामाचा आढावा मांडला. भारती दिगडे यांनी बूथ व्यवस्थापन, शक्ती केंद्रप्रमुख रचना याबद्दल माहिती दिली. संघटनप्रमुख मकरंद देशपांडे यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.

Web Title: Six corporators protest in BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.