महापालिकेसमोर दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:29+5:302020-12-08T04:24:29+5:30

सांगली : विविध मागण्यांसाठी सोमवारी दिव्यांगांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. नॅशनल ॲन्टिक्राईम ह्युमन राईट्‌स कौन्सिल ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हे ...

The sit-in agitation of the disabled in front of the Municipal Corporation | महापालिकेसमोर दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन

महापालिकेसमोर दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन

सांगली : विविध मागण्यांसाठी सोमवारी दिव्यांगांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. नॅशनल ॲन्टिक्राईम ह्युमन राईट्‌स कौन्सिल ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिव्यांगाच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दिव्यांगांना व्यवसायासाठी दुकानगाळे द्यावेत, विनाअट घरकुल देण्यात यावे, पाच टक्के निधीतील रक्कम प्रत्येकवर्षी त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, घरपट्टीत ५० टक्के माफी द्यावी, दिव्यांग खेळाडूंना मानधन सुरू करावे, या मागणीसाठी दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन, त्यांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेण्याची ग्वाही दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलावर शिकलगार, सचिव अस्लम कोथळी, जैद मगदूम, गौस भंडारी, आशा पाटील, सुरेश गायकवाड, शफीक खलिफा, शंकर फणसे, सुरेश भंडारे, महादेव काळे, दत्ता जाधव, मलिक भंडारी, मंगेश पुजारी यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

Web Title: The sit-in agitation of the disabled in front of the Municipal Corporation