शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

Sangli: धाकट्या भावाला किडनी देऊन रक्षाबंधन साजरी, शिराळ्यातील सुजाता उबाळे यांचा समाजासमोर आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 11:55 IST

विकास शहा शिराळा : रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणासाठी पवित्र धागा बांधणे. बहिणीनेच आपल्या धाकट्या भावाला स्वतःची किडनी देऊन ...

विकास शहाशिराळा : रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणासाठी पवित्र धागा बांधणे. बहिणीनेच आपल्या धाकट्या भावाला स्वतःची किडनी देऊन जीवनदान देऊन एक आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. शिराळ्यातील सुजाता संदीप उबाळे या बहिणीने धाकटा भाऊ धनाजी गायकवाड यास स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.आनंदराव गायकवाड यांचे कुटुंब पत्नी संजीवनी, सुरेखा देशमुख, सीमा चव्हाण, सुजाता उबाळे या तीन मुली, धनाजी एक मुलगा. बेताची परिस्थिती पानपट्टीचे छोटे दुकान. यावर उदरनिर्वाह सुरू होता आणि या कुटुंबाला जणू नजर लागली म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१७मध्ये आनंदराव यांना हृदयविकाराचा झटका आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा धनाजी याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यामुळे एक दोन गुणांनी स्पर्धा परीक्षेचे यश हुकले. याचवर्षी धनाजीस सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्याच्या दोन्ही किडन्या पन्नास टक्के काम करत नसल्याचे आढळून आले. आता किडनी बद्दलण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला आई किडनी देण्यास तयार झाल्या. मात्र, वयाच्या अडचणीमुळे त्या किडनी देऊ शकल्या नाहीत. यावेळी वडील आनंदराव यांनी शिराळ्यातील धाकटी मुलगी सुजाता उर्फ चांदणी (वय, ३६) यांना याबाबत विचारले. यावेळी भावासाठी किडनी देण्यास त्या तयार झाल्या. मात्र, ४ एप्रिल २०२४ रोजी आनंदराव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर या दुःखातून सावरत ८ ऑगस्टला किडनी देण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. यानुसार धनाजी (वय ३५) व सुजाता यांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पुणे येथे दि. १५ जुलै रोजी दाखल केले. दि. ८ रोजी डॉ. वृषाली पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

विविध मान्यवरांचे सहकार्यबहीण भावाला किडनी देऊन रक्षाबंधन साजरी करणार आहे. यासाठी त्यांना आमदार मानसिंगराव नाईक, डी वाय पाटील विद्यापीठाचे पी.डी. पाटील, ॲड. प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, संदीप उबाळे, मंदार उबाळे, राहुल गायकवाड, संतोष देशपांडे, प्रवीण थोरात, अमोल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. शिराळा येथील रमेश सोनटक्के यांनी आपला भाऊ अशोक सोनटक्के यांना काही वर्षांपूर्वी किडनी देऊन जीवदान दिले होते.

टॅग्स :SangliसांगलीRaksha Bandhanरक्षाबंधनOrgan donationअवयव दानshirala-acशिराळा