शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सांगलीत कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 2:03 PM

सांगली शहराची जीवनदायीनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबविली. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्पही करण्यात आला. निर्माल्य नदीत टाकणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीमही हाती घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्यावतीने स्वच्छता : निर्माल्य टाकणाऱ्यांविरोधात गांधीगिरी

सांगली : शहराची जीवनदायीनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबविली. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्पही करण्यात आला. निर्माल्य नदीत टाकणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीमही हाती घेतली जाणार आहे.महापालिकेच्या स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाली. वर्धापन दिनानिमित्ताने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कृष्णा प्रदूषणमुक्तीचा संकल्प केला होता. शुक्रवारी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अजिंक्य पाटील, प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, सुब्राव मद्रासी, संजय कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारीही कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

महिला नगरसेविकांनीही नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. सुमारे एक टन कचरा, प्लास्टिक व निर्माल्य नदीपात्रातून काढण्यात आले. कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने हाती घेतला जाणार असल्याचे भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल, असे स्पष्ट केले. महापौर संगीता खोत यांनी महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करणार असून, पुढील अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा मानस असल्याचे सांगितले.कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्व नगरसेवक शनिवारपासून कृष्णा नदीच्या पुलावर निर्माल्य नदीत टाकणऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम हाती घेणार आहेत. तसेच नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याबाबतही जनतेत जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपायुक्त मौसमी चौगुले-बर्डे, सहा आयुक्त दिलीप घोरपडे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद, आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, डॉ. सुरवशी, अग्निशमन अधिकारी देसाई, चिंतामणी कांबळे यांच्यासह विविध विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगलीriverनदी