शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:25 IST

महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.

ठळक मुद्देप्रांत,तहसीलदारांच्या समोर जयंत पाटील यांचा इशारासामान्य जनतेची कामे न झाल्यास तुमच्या दारात येणार

इस्लामपूर: महसूल विभागाच्या तलाठी आणि इतर कनिष्ठ कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत,येत्या महिन्याभरात यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दारात यावे लागेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिला.यावेळी विशेष म्हणजे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.७/१२ उताऱ्यातील ऑनलाइन नोंदीत झालेल्या चुका, रेशन धान्य मिळत नाही,जमीन खरेदीच्या नोंदी प्रलंबित आहेत,शेत जमिनीची मोजणी होत नाही यासारख्या तक्रारी शेतकरी आणि सामान्य जनतेकडून आल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.यावेळी पी.आर.पाटील,तालुकाध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,युवकचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, जेष्ठ नेते विष्णुपंत शिंदे,बाळासाहेब पाटील,नेताजीराव पाटील उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले,सामान्य माणसाच्या कामात राजकारण करू नका.कोणतरी सांगते म्हणून,तर कुणा कडून पैसे घेऊन कामे करण्याची पद्धत बंद करा.प्रशासनाने न्याय्य पद्धतीने काम करावे.जनतेच्या महसूल खत्याविषयी तीव्र भावना आहेत.त्याची दखल घेत येत्या महिन्यात सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशी सूचना प्रशासनाला केली.

प्रांत नागेश पाटील यांनी,आलेल्या सर्व सूचनांवर गांभीर्याने विचार करून साम्यान नागरिकांना त्रास झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले.तसेच सर्व प्रलंबित कामे निर्गत करताना एका मदत कक्षाची स्थापना करून सर्वांच्या सहकार्याने काम करू असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलTahasildarतहसीलदारSangliसांगली