श्यामरावनगरमध्ये घर फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:30 IST2021-08-21T04:30:28+5:302021-08-21T04:30:28+5:30

सांगली : शहरातील श्यामरावनगरतील महसूल कॉलनीमधील बंद बंगला फोडून चाेरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह सोने, नाणी, परकीय चलन असा ...

In Shyamravnagar, a house was broken into and 73,000 items were stolen | श्यामरावनगरमध्ये घर फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास

श्यामरावनगरमध्ये घर फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगली : शहरातील श्यामरावनगरतील महसूल कॉलनीमधील बंद बंगला फोडून चाेरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह सोने, नाणी, परकीय चलन असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अमित आनंदराव घोडके (रा. जॉय बंगलो, श्यामरावनगर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्यामरावनगरमधील महसूल कॉलनीमध्ये इंजिनिअर असलेले घोडके राहण्यास आहेत. बुधवारी रात्री ते बाहेर गेले होते. या कालावधीत घरी कोणी नसल्याने व दाराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधत कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले रोख ५० हजार रुपये, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, जुनी नाणी, परकीय चलन व क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचा प्रकार घोडके यांच्या लक्षात आला. त्यानंतर तातडीने त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद केली. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: In Shyamravnagar, a house was broken into and 73,000 items were stolen