जिल्ह्यात आज स्वच्छतेसाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:29+5:302021-09-17T04:32:29+5:30

सांगली : केंद्र शासन व राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियाचा दुसरा टप्पा ...

Shramdan for cleanliness in the district today | जिल्ह्यात आज स्वच्छतेसाठी श्रमदान

जिल्ह्यात आज स्वच्छतेसाठी श्रमदान

सांगली : केंद्र शासन व राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा ते बारा दरम्यान सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानात पदाधिकारी, ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी, आदींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सकाळी दहा वाजता ग्रामपंचायती व पंचायत समित्यांमध्ये स्वच्छतेची शपथ घेतली जाणार आहे. यानंतर बारापर्यंत स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमार्फत श्रमदान करून गावात स्वच्छता कार्यक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छता अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालये, स्थळे, रेल्वेस्थानक, बसस्थानके, गावालगतची स्वच्छता केली जाणार आहे.

Web Title: Shramdan for cleanliness in the district today