ऊसपट्ट्यात चक्काजाम करणार - शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:25 IST2018-11-08T05:25:36+5:302018-11-08T05:25:50+5:30
ऊस दराचा प्रश्न चिघळत चालला असून, शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने मार्ग काढावा.

ऊसपट्ट्यात चक्काजाम करणार - शेट्टी
सांगली : ऊस दराचा प्रश्न चिघळत चालला असून, शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने मार्ग काढावा. अन्यथा २०१३ प्रमाणे उद्रेक होईल. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. येत्या रविवारी ऊस पट्ट्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असून, ठिकठिकाणी चक्काजाम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांंतदादांनी श्रेयासाठी मध्यस्थी केल्याने यंदा त्यांच्याशी चर्चाच करणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत किरकोळ आहेत. त्यांच्या संघटनेने कितीही वल्गना केली असली तरी, ते आमचा स्पर्धक नाहीत, असेही शेट्टी यांनी सांगितले.