शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:43 IST

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

सांगली : येथील सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊंड शूटर शरयू संजय मोरे (वय २२) हिचा बारामती येथे मोपेड दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शरयू हिने नीट परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवले होते. बारामती येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री बारामती ते भिगवण रस्त्यावरून वसतिगृहाकडे मोपेडवरून जाताना दुभाजकाचा अंदाज न आल्याने धडकून शरयू व तिची मैत्रीण जखमी झाली. उपचार सुरू असताना शरयूची प्राणज्योत मालवली.शरयू हिने दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाऊ आदित्य याच्याबरोबर निष्णात (रिनाऊंड शूटर)होण्याचा बहुमान मिळवला होता. खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन-ट्रॅप या क्रीडा प्रकारात तिने देदीप्यमान यश मिळविले. असा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रीतील पहिली नेमबाज ठरली. राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्ण, रौप्य, दोन कास्य पदकांची कमाई केली होती.सासुर्वे येथे अंत्यसंस्कारआंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती सराव करीत होती, तसेच एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक मृत्यूने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शरयूच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रात्रीच अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी सासुर्वे येथे रवाना झाले. रविवारी सकाळी शरयूवर अंत्यसंस्कार झाले.