शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 14:00 IST2021-09-18T13:59:53+5:302021-09-18T14:00:36+5:30
नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी

शोले स्टाईल: कडेगांव तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन सुरू
कडेगांव (जि. सांगली) : कडेगाव नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातुन विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी .या.मागणीसाठी पाणी संघर्ष समितीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी ऐस देशमुख व वंचित आघाडीचे जीवन करकटे हे तहसील कार्यालय इमारतीवर चढले असून उडी मार आंदोलन सुरू केले. आंदोलकांना रोखण्यासाठी कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्यासह पोलीस तसेच नायब तहसीलदार जयवंत लाड, कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी कपिल जगताप आदींसह प्रशासन प्रयत्नशील आहे.
कडेगाव तहसीलदार कार्यालयावरून आंदोलकांनी उडी मारू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु भ्रष्ट कारभाराची चौकशीचे आदेश लेखी दिले नाही तर थोड्याच वेळात तहसील इमारतीवरून उडी घेणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.आंदोलन स्थळावर लोकांनी मोठी गर्दी केली असून या आंदोलनानेप्रशासन व पोलोसांची धावपळ उडाली आता .आता तातडीची बैठक घेऊन व चर्चेने प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत .