शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : पॉर्न क्लीप दाखवून आठ वर्षीय मुलीचा अल्पवयीन मुलाकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:05 IST

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर चांदोली वसाहत येथील आठवर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीला ...

ठळक मुद्देअत्याचार केल्यानंतर ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर चांदोली वसाहत येथील आठवर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीला उसाच्या शेतात नेऊन मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवित तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने डोक्यात मारून तिच्याच लेगीन्सने गळा आवळून खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

विठलाईनगर चांदोली वसाहतीमध्ये राहणारी पहिलीत शिकणारी मुलगी बुधवारी सायंकाळी दुकानातून खाऊ आणायला जाते म्हणून घरातून बाहेर गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. बराचवेळ झाले तरी ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांसह इतरांनी तिचा शोध सुरू केला होता. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास तुंंग येथील वासू पाटील यांच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला होता.

माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामीण पोलीस व एलसीबीच्या पथकाने परिसरात कसून तपास सुरू केला होता. गावात मुक्काम ठोकून पथकाने तपास सुरू ठेवला होता.

बुधवारी सायंकाळी मुलगी दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली असताना, दुकानाच्या पाठीमागील बाजूस उसाच्या शेतात असलेल्या चेंबरजवळ अल्पवयीन मुलासोबत ती खेळत असल्याची माहिती यावेळी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्या मुलास विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोबाईल व गुन्ह्याच्या वेळचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी