शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Sangli Crime: पलूसमधील वृद्धाच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पाच लाखाची सुपारी अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 15:37 IST

पोलिसांनी पाचजणांना केली अटक

पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथील अपघातात ठार झालेले विजय नाना कांबळे (वय ६२) यांचा अपघात नसून जमिनीच्या वादातून धडक देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय ५२) व अभयसिंह मोहनराव पाटील (४०) यांनी कांबळे यांना मारण्यासाठी तिघांना पाच लाखांची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. शुक्रवार (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली हाेती.मृत विजय कांबळे हे पलूस न्यायालयातील काम आटाेपून तहसील कार्यालय ते पोलिस ठाणे रस्त्यावरून निघाले हाेते. या दरम्यान एका अज्ञात माेटारीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हाेता. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी जितेश सुरेश बनसोडे (रा. नागराळे) यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली होती.सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास करताना नंबरप्लेट नसलेली एक आलिशान माेटार कुंडलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याची माहिती समाेर आली. सीसीटीव्ही फुटेजची मदत व तांत्रिक तपासात भरधाव वेगाने जाणारी माेटार (एमएच ०९ डीएम ४०४१) कोल्हापूर येथील एका व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले.त्या व्यक्तीची चाैकशी केली असता २०२१ मध्ये ही माेटार भवानीनगर (ता. वाळवा) येथील संग्राम राजेंद्र पाटील (वय २२) याला दोन लाखास गहाण दिल्याचे समाेर आले. संग्राम पाटील याला ताब्यात घेऊन कसून तपास केला असता त्याने कांबळे यांना धडक दिल्याची कबुली दिली. दरम्यान, पलूस येथील सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांच्याशी संपर्काचे तांत्रिक पुरावे मोबाइल संपर्कावरून स्पष्ट झाले.तपासात कांबळे यांचा अपघात नसून सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. विजय कांबळे याचा अभयसिंह पाटील व सुनील घोरपडे यांच्याशी कूळकायद्यातील बारा एकर जमिनीचा वाद हाेता. कांबळे वारंवार त्यांना पाेलिसांत खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून धमकावत हाेते. यामुळे कांबळे यांना उचलून नेऊन किंवा धडक देऊन ठार मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांनी संग्राम पाटील याला दिली.

यानंंतर संग्रामने आपले मित्र रुतीक भोपाल पाटील (वय २२) व रोहन रमेश पाटील वय २४, दोघेही रा. घोगाव) यांना घेऊन विजय कांबळे याच्यावर पाळत ठेवली. २० जानेवारी राेजी कांबळे तहसील कार्यालय ते पाेलिस ठाणे रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना माेटारीची धडक दिली.तांत्रिक व परिस्थितिजन्य पुरावे तपासून पाचही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक सुरेंद्र धुमाळे, राजेश्री दुधाळे, हवालदार प्रवीण पाटील, दिलीप गोरे, राकेश भोपळे, गणी पठाण, संजय गलुगडे, प्रमोद साखरपे, प्रवीण मलमे, अमोल कदम यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस