शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक प्रकार! वाळव्यात काळी जादू; स्व. राजाराम बापूंच्या फोटोला टाचण्या टोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 20:34 IST

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात

वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोला टाचण्या टोचल्याचे आणि फोटोवर लिंबू ठेवल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत.  

या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे, "सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, "असे पवार यांनी म्हटले आहे.

"पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारं आहे. हे करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही विनंती!, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी १९०० इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६५७ व पंचायत समितीसाठी एक हजारांवर अर्जांचा समावेश आहे. दाखल अर्जांची गुरुवार दि. २२ रोजी छाननी होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले.पाच दिवसांच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Black magic incident: Pins stuck in Rajaram Bapu Patil's photo

Web Summary : A shocking incident occurred in Walwa taluka where pins were found stuck in the photo of Late Rajaram Bapu Patil, with a lemon placed on it, sparking outrage. Rohit Pawar condemned the act. Ahead of elections, a record 1900 applications were filed for council positions.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Sangliसांगली