शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 10:18 IST

कडेगाव तालुक्यातील प्रकार, २८जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल

कडेगाव (जि. सांगली) :  कडेगाव तालुक्यातील खेराडे- वांगीमध्ये शनिवारी (दि.१८) एका व्यक्तीवर  अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बुधवारी (दि. २२) समजले की, ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह होती! आता खेराडे-वांगी गावातील २८ जणांना कडेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे यांनी दिली. 

खेराडे-वांगी गावातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षे वयाच्या एका व्यक्तीस मुंबई येथे एका रुग्णालयात शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवार, १८ एप्रिलला पहाटे त्याचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह खेराडे- वांगीत आणला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु बुधवारी दुपारी या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे संबधित हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यानंतर तात्काळ आरोग्य विभाग तसेच प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगाव तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी गावास भेट देऊन कोरोना पॉझटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या २८ व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू