शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

सांगली जिल्ह्यात काँग्रेसला धक्का, संपतराव माने यांच्या वारसदारांच्या हाती ‘घड्याळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:12 IST

शरद पवार गटात सामील : जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य

दिलीप मोहिते विटा : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून संपूर्ण सांगली जिल्ह्यावर काँग्रेसची कमांड ठेवणारे खानापूरचे नेते माजी आ. स्व. संपतराव माने यांच्या वारसदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. यावेळी स्व. माने यांचे वारसदार राजकुमार माने, काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र माने, विराज माने यांच्यासह त्यांच्या समर्थक गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ हातात घेतले.खानापूरचे माजी आ. स्व. संपतराव माने यांनी पहिल्यापासून काँग्रेसचे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नवे वादळ उठविले होते. एकेकाळी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूकीवेळी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसची उमेदवारी खानापूर तालुक्यातून निश्चित केली जात होती. यशवंत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे माजी आ. स्व. माने यांच्या माध्यमातून काँग्रेसला मोठी ताकद मिळाली होती.त्यांच्या पश्चात स्व. माने यांचे वारसदार असलेले राजकुमार माने, राजेंद्र माने यांनीही काही वर्षे काँग्रेसला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका गावपातळीवर आघाडीतून लढविल्या असल्या तरी त्यांचे काँग्रेस पक्षावरील त्यांचे प्रेम व त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.खानापूर पूर्व भागातील काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे यांनी मात्र माने समर्थक कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन शिवसेनेशी जवळीक करीत नगरपंचायतीच्या निवडणूका लढविल्या.तरीही माजी आ. स्व. संपतराव माने यांचे वारसदार असलेले राजकुमार व राजेंद्र माने यांनी त्यांचा गट कायम शाबूत ठेवला. काँग्रेसचीच तालुक्यात वाताहत व गटबाजीला उधाण आले असताना माजी आ. स्व. माने यांच्या वारसदारांनी वेगळा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष  आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या गटात सहभागी झाले.यापुढे स्व. माने यांच्या वारसदारांसह समर्थक कार्यकर्त्यांचा गट खा. पवार व आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आ. स्व. संपतराव माने यांच्या खानापूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी राजकुमार माने, राजेंद्र माने, विराज माने, हर्षल तोडकर यांनी आ. पाटील यांचे स्वागत केले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, किसनराव जानकर, अ‍ॅड. संदीप मुळीक, विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस