शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:33 IST

जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार धक्का देत सांगली जिल्ह्यात पक्ष मजबूत केला. चार माजी आमदारांसह, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबई येथे प्रवेश केला.माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, निशिकांत पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू होत्या. अखेर मंगळवारी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.तम्मनगौडा रवी पाटील भाजप नेते असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जतमधून त्यांना भाजपने विधानसभा उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आजच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील.राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. या चार माजी आमदारांसह मुन्ना कुरणे, संग्राम जगताप, रणधीरसिंह नाईक, पलूसचे नीलेश येसुगडे, निवृत्ती शिंदे, प्रमोद सावंत, अनिल पाटील आदींनी पक्षप्रवेश केला.

जिल्हा मंत्रिपदापासून वंचित : अजित पवारपक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत सांगली जिल्ह्याला सातत्याने चांगली मंत्रिपदे मिळत होती. पण गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. आता भविष्यात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीने राजकीय वाटचाल करु. प्रवेश केलेल्या नेत्यांना भविष्यात संधी देऊ.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार