शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
5
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
6
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
8
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
9
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
10
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
11
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
12
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
13
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
14
लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?
15
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
16
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
17
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
18
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
19
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
20
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:00 IST

विटा/खानापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार ...

विटा/खानापूर : कोल्हापूरच्याशिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होणार असून, त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. तत्पूर्वी आमदार सुहास बाबर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून उपकेंद्राची घोषणा आजच करावी, अशी मागणी सभागृहात केली होती. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला.शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी २०१३ पासून सर्वस्तरांतून पाठपुरावा सुरू होता. याबाबतचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने समिती स्थापन केली होती. या समितीने हे उपकेंद्र खानापूर येथे करावे, अशी शिफारस करणारा अहवाल विद्यापीठाला सादर केला होता. दिवंगत नेते अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, ‘सिनेट’चे सदस्य ॲड. वैभव पाटील यांनीही या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला होता.आमदार बाबर यांनी बुधवारी विधानसभेत म्हणाले, विद्यापीठाच्या खानापूर उपकेंद्राची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत आता लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राचा निर्णय आजच जाहीर करावा. हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला.गायरान जमीन देण्याची तयारीचंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२४ला शासनाला मिळाला असून, या प्रस्तावानुसार खानापूर येथे उपकेंद्र करण्याचा निर्णय जाहीर करीत आहे. या उपकेंद्राला खानापूर येथील गट नं. ५७२/१ मधील ४२ हेक्टर ५६ आर गायरान जमीन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली.

घोषणेनंतर फटाक्यांची आतषबाजीनिर्णय जाहीर झाल्याचे समजताच विटा शहरासह खानापूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्ते व नागरिकांनी जल्लोष साजरा केला. आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

“दिवंगत नेते अनिल बाबर यांनी खानापूरला उपकेंद्र करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर उपकेंद्र मंजुरीसाठी यश आले. खानापूरच्या उपकेंद्रामुळे दुष्काळी तालुक्यांना न्याय मिळाला आहे. मतदारांना दिलेला शब्द पाळू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो.” - सुहास बाबर, आमदार, खानापूर

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठchandrakant patilचंद्रकांत पाटील