शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिकल नसणाऱ्यांनाही शुल्क, शिवाजी विद्यापीठाचा अजब आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:39 IST

रिपब्लिकन स्टुडंट युनियनकडून कुलगुरुंकडे आक्षेप

सांगली : ज्या अभ्यासक्रमांमध्ये प्रॅक्टिकलचा (प्रात्यक्षिक) समावेश नाही अशा अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवरही शिवाजी विद्यापीठाकडून प्रात्यक्षिक फी लादण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. याबाबत रिपब्लिकन स्टुडंट युनियनने कुलगुरुंकडे तक्रार केली असून, फीवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.शिवाजी विद्यापीठाने प्रात्यक्षिक व मार्कशीट फीच्या माध्यमातून केलेल्या परीक्षा शुल्कवाढीबद्दल संताप व्यक्त होत आहे. या फीवाढीमुळे परीक्षा शुल्कात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. फी रेग्युलेटिंग ॲथोरिटी व विद्यापीठ फी फिक्शेशन कमिटी यांनी निर्धारित केलेली सर्व फी विद्यार्थ्यांनी भरली आहे. या फीमध्ये ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आदींचा समावेश आहे.

तरीही आता शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार एकूण परीक्षा फीच्या ५० टक्के फी ही प्रात्यक्षिक फी म्हणून अतिरिक्त द्यावी लागेल. मार्कशीट, प्रात्यक्षिक फी यापूर्वी आकारण्यात आली नव्हती. प्रात्यक्षिक, मार्कशीट फी ही गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याची भावना स्टुडंट युनियनने व्यक्त केली आहे. युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी याबाबत कुलगुरुंकडे तक्रार केली आहे.त्यात म्हटले आहे की, विद्यापीठाची परीक्षा फी ही विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेश फीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा पद्धतीची फी आकारण्यात येऊ नये. हा निर्णय मागे घेण्यात यावा. ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक फी, मार्कशीट फी भरली आहे, त्यांना ती तात्काळ परत देण्याच्या लेखी सूचना महाविद्यालयांना द्याव्यात.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही फटकाअनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, ओबीसी व इतर, आर्थिक मागासवर्गीय वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रीशिपचा फॉर्म आधीच भरलेला आहे. त्यामुळे विद्यापीठाने मागणी केलेल्या वाढीव फीचा लाभ त्यांना स्कॉलरशिप व फ्रीशिपमधून मिळणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने घेतलेला निर्णय मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरही अन्यायकारक आहे.आंदोलन करण्याचा इशाराशिवाजी विद्यापीठ आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत नसून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७ चे सरळ उल्लंघन करत आहे असे दिसत आहे. फीवाढीसंदर्भात विद्यापीठाने संबंधित शासन विभागाची पूर्व परवानगी घेतली आहे का याचा खुलासा करावा. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे वेटम, बहुजन समाज पार्टी युवा अध्यक्ष सुनील क्यातन यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ