शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पवार पुन्हा हातात घड्याळ बांधण्यासाठी आतूर, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:12 IST

सध्या त्यांची भूमिका तटस्थ आहे, पण आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

अशोक पाटील

इस्लामपूर : दिवंगत एम. डी. पवार यांचे कुटुंबीय व यशोधन फाउंडेशनचे संस्थापक, माजी नगरसेवक शिवाजी पवार नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हातात घड्याळ बांधण्यासाठी आतूर झाले आहेत, परंतु त्यांचे बंधू आणि विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांच्या प्रेमापोटी त्यांनी निर्णय राखून ठेवला आहे.

मागील निवडणुकीत शिवाजी पवार यांच्या मातोश्री सुशिला पवार यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी दाखल केली होती; परंतु ऐनवेळी पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का बसला. पालिकेत विकास आघाडीची सत्ता आली.दुसरीकडे शिवाजी पवार यांचे बंधू वैभव पवार सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. सभागृहात त्यांच्या आक्रमकता अनेकदा दिसून आली. दोन्ही पवार बंधू एकत्र आले; परंतु शिवाजी पवार यांनी यशोधन ग्रुपवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या त्यांची भूमिका तटस्थ आहे, पण आगामी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

घड्याळ बांधणार, की आघाडीसोबत जाणार?

काँग्रेसचे नेते परंतु इस्लामपुरातील राजकारणात भाजपशी सलगी असलेले वैभव आणि विजय पवार हे दोघे बंधू राष्ट्रवादीला विरोध करण्यात आघाडीवर असतात. आता शिवाजी पवार निवडणुकीत वैभव आणि विजय पवार यांच्या बरोबरीने विकास आघाडीतून लढणार की, पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार हे स्पष्ट झालेले नाही.

मी भाजपमध्ये अस्वस्थ आहे. बंधुप्रेमापोटी घड्याळ बांधावे वाटत नाही! पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत एक बैठकही झाली; परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणूक लढविणार आहे. - शिवाजी पवार, माजी नगरसेवक

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस