शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

सांगली जिल्हा नियोजनमध्ये शिवसेना-भाजप फिफ्टी फिफ्टी ‘फॉर्म्युला’

By अशोक डोंबाळे | Updated: December 16, 2023 17:46 IST

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये भाजप- शिवसेना (शिंदे गट) युतीने ५०-५० असा ‘फॉर्म्युला’ला स्वीकारला आहे. ...

अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने ५०-५० असा ‘फॉर्म्युला’ला स्वीकारला आहे. उर्वरित चार जागांवर जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पक्ष, आठवले गट, रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी एक जागा दिली आहे. जिल्हास्तरावरुन निवडीची यादी निश्चित करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हा नियोजनच्या स्वीकृत सदस्यांची यादी कधी मंजूर करुन घेणार आहेत, असा प्रश्नही इच्छुक सदस्यांनी उपस्थित केला आहे.राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेतील नेत्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नेते खासगीत करताना दिसून येत होते. जिल्हा पातळीवरील विविध समित्यांवर भाजप नेत्यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेच्या नेत्यांची नावे मागवली जातात; पण ऐनवेळी ती वगळण्यात येतात. या तक्रारीमुळेच जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांसाठी ५०-५० ‘फॉर्म्युला’प्रमाणे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची नावे निश्चित केली आहेत. या निवडीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांनाच संधी मिळाली आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, तासगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांना भाजपच्या नेत्यांनी संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांना संधी मिळाली आहे. 

जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपने मित्र पक्षांनाही संधी देण्यात आली आहे. यामध्ये जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे लक्ष्मण सरगर, आठवले गटाचे पोपट कांबळे आणि रयत क्रांती संघटनेकडून विनायक जाधव यांना संधी देण्यात आली आहे. या १२ सदस्याची नावे मंजूरीसाठी शासनाकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये पाठविली आहे. पण, अद्याप शासनाकडून या सदस्यांची यादी निश्चित होऊन प्रशासनाकडे आली नाही. याबद्दल इच्छुक सदस्यांत उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

जिल्हा नियोजनचे संभाव्य सदस्यविलासराव जगताप, संग्रामसिंह देशमुख, सत्यजित देशमुख, सुनील पाटील (भाजप), आनंदराव पवार, सुहास बाबर, भीमराव माने, तानाजी पाटील (शिंदे गट शिवसेना), समित कदम (जनसुराज्य), लक्ष्मण सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष), पोपट कांबळे (आठवले गट), विनायक जाधव (रयत क्रांती).

जिल्हा प्रशासनाने आमच्याकडून नियोजन समिती सदस्यत्वासाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरुन घेतले आहेत. १२ सदस्यांची नावेही शासनाकडे गेली असून त्यास अंतिम मंजुरी मिळाली नाही. लवकरच शासनाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नियोजनच्या येत्या सभेला आम्ही असणार आहे.  - सत्यजित देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजप.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPlanning Commissionनियोजन आयोग