आष्ट्यात शिवसेना, स्वाभिमानीच्यावतीने केंद्राचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:34+5:302020-12-08T04:24:34+5:30

आष्टा : आष्टा शहर शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आणलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध ...

Shiv Sena in Ashta, protest of the Center on behalf of Swabhimani | आष्ट्यात शिवसेना, स्वाभिमानीच्यावतीने केंद्राचा निषेध

आष्ट्यात शिवसेना, स्वाभिमानीच्यावतीने केंद्राचा निषेध

आष्टा : आष्टा शहर शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आणलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

शिवसेना आष्टा शहरप्रमुख राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, उपशहर प्रमुख गणेश माळी, स्वाभिमानी संघटनेचे शहराध्यक्ष सुदर्शन वाडकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टा बसस्थानक चौकात शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आला.

यावेळी अभय मंजुगडे, स्वप्नील माने, गजानन दाटीया, राहुल वाडकर, रवींद्र तोडकर, धनाजी माळी उपस्थित होते. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आष्टा बंदची हाक देण्यात आली.

फोटो: केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करताना शिवसेनेचे राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, गणेश माळी व सुदर्शन वाडकर.

Web Title: Shiv Sena in Ashta, protest of the Center on behalf of Swabhimani