शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, विधानसभा निवडणूक चुरशीची होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 18:16 IST

आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या

अशोक पाटीलइस्लामपूर : गौरव नायकवडी यांची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना पक्ष निवडणूक प्रभारीपदी निवड झाली. त्यामुळे आगामी विधानसभेला पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी उमेदवारीसाठी वर्षा निवासस्थानावर ठाण मांडून आहेत. इस्लामपूर मतदारसंघ कसल्याही परिस्थितीत महायुतीमध्ये शिवसेनेसाठी घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नायकवडी व पवार यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत.

वाळवा-इस्लामपूर मतदारसंघातील सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांची मतांची आकडेवारी १९९०-८१०१८, १९९५-९४६०५, १९९९-८३११२, २००४-१२०८३०, २००९-११०६७३, २०१४-११३०४५, २०१९-११५५६३ विरोधकांना आव्हान देणारी आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा, असा अलिखित ठराव महायुतीत झाला. त्यामुळे २०१९ मध्ये गौरव नायकवडी यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली. २०२४ चीही उमेदवारी शिवसेनेलाच असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी केला आहे.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी आणला आहे. परंतु, शहरातील विकासकामांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही. महायुतीकडून सर्वाधिक विकास निधी मतदारसंघात आणल्याचा दावा सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. विशेषत: जयंत पाटील यांचेही समर्थक निधी आणल्याचा दावा करत आहेत. काही महिन्यातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कामांना ब्रेकही लागेल. तरीसुद्धा आगामी २०२४ ची विधानसभा लढण्यासाठी जयंत पाटील समर्थक तयारीला लागले आहेत.विरोधात म्हणून उमेदवारी मिळण्यासाठी भाजप व शिवसेनेतील इच्छुक आग्रही आहेत. परंतु, महायुतीकडून आजही उमेदवार निश्चित नसल्याने राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी जयंत पाटील यांच्या प्रचाराची धुरा हातात घेतली आहे.

निवडणूक चुरशीची होणार..जयंत पाटील यांच्याकडे राज्यातील महाआघाडीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना इस्लामपूर मतदारसंघात वेळ देता येणार नाही. कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून एकत्रित काम केले, तरच जयंत पाटील यांना २०२४ ची विधानसभा सोपी जाईल. अन्यथा महायुतीतील विरोधक एकवटल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

इस्लामपूर मतदारसंघ हा शिवसेनेसाठीच आहे. उमेदवारीसाठी आपण अग्रस्थानी आहे. परंतु, आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी उमेदवार ठरणार आहे. गौरव नायकवडी आणि माझ्यात समन्वय असून ज्यांना उमेदवारी देतील, त्यांचा आपण निष्ठेने प्रचार करू.  - आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे