शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सदाभाऊ, इद्रिस नायकवडींनी सुपारी घेतली, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा आरोप; नेमकं प्रकरण काय..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:45 IST

आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सांगली : विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि इद्रिस नायकवडी यांनी गोरक्षकांवर खालच्या पातळीवर टीका केली. राजरोसपणे गायींची कत्तल करणाऱ्यांची सुपारी दोघांनी घेतली असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी येथे केला.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे येथील मारूती चौकातील शिवतीर्थासमोर शुक्रवारी आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नायकवडी यांनी गोरक्षकांवर केलेल्या टीकेबद्दल जोरदार निदर्शने करण्यात आली. दोन्ही आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.चौगुले म्हणाले, अनेक ठिकाणी गायींची कत्तल केली जाते. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असतात. तरीही जीवाची बाजी लावून अनेक गोरक्षक गायींची सुटका करून आणतात. या गायींच्या कत्तलीबद्धल सदाभाऊ बोलत नाहीत. अनेक प्रामाणिक गोरक्षक गोवंशाचे रक्षण करतात. मात्र सुपारी घेऊन त्यांच्यावर सदाभाऊ, नायकवडी यांनी आरोप केले आहेत. परंतू यापुढे असे आरोप आम्ही सहन करणार नाही.ते पुढे म्हणाले, कडकनाथ कोंबडी प्रकरणात घोटाळा करताना सदाभाऊंना शेतकरी आठवले नाहीत. सत्तेत असणारे हे आमदार गोरक्षणाच्या बाबतीत विरोधात भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे गोधन वाचवण्यासाठी तसेच कत्तलखान्याकडे गोधन जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. परंतू यापुढे गोरक्षकांवर आरोप केले तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. काही हप्तेखोर बोगस गोरक्षक सध्या कार्यरत झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू.यावेळी संघटनेचे अभिमन्यू भोसले, राज पडळकर, विनायक एडके, श्रीकांत माने, बबन सोलणकर, संदीप जाधव, रामभाऊ जाधव, राजू जाधव, पिंटू माने, विक्रांत कोळी, सागर रजपूत, लक्ष्मण मंडले, जयदीप सदामते, दिगंबर साळुंखे, अजिंक्य बोळाज, मोहन शिंदे, प्रशांत जमदार आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.