ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:08 PM2018-05-06T21:08:38+5:302018-05-06T21:45:16+5:30

Shirol killed in three accidents | ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू

ट्रक आणि कारचा अपघात; तिघांचा मृत्यू

Next

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-जत रस्त्यांवर कोकळे गावाजवळ आयशर टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूर व शिरोळ येथील तीन तरुण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी पावणे चार हा अपघात झाला.
लखन भीमराव मोहिते (वय ३०), सुभाष मारुती चव्हाण (३१, दोघे रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), विशाल सदाशिव माळी (३१, जयशिंगपूर, ता शिरोळ) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी झालेल्या सचिन प्रकाश मोहिते (२८, जयसिंगपूर) यास मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळी सोडून पलायन केले आहे.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत व जखमी रविवारी सकाळी मोटारीने (क्र. एमएच-०९-पीएम-९९७६) जत येथे नातेवाईकाच्या लग्नास गेले होते. ते लग्न आटोपल्यानंतर ते जयसिंगपूरला निघाले होते. कोकळे येथे आल्यानंतर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने (क्र. एपी-०४-टीडब्ल्यू-२०६३) त्यांच्या मोटारीने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की मोटारीतील तिघे मोटारीच ठार झाले. तिघांच्या डोक्याला मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता.

अपघातग्रस्त मोटारीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली होती. कवठेमहांकाळ पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.

 

Web Title: Shirol killed in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली