शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: 'छावा'त झळकला शिराळ्याचा सागर रसाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:31 IST

हिंदी, इंग्रजी, दाक्षिणात्य व मराठी चित्रपटात साकारल्या भूमिका

शिराळा : शिराळ्याला नागपंचमी प्रमाणेच इतिहासही आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न झाला होता. याचप्रमाणे सध्या सर्वदूर चर्चेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने देशभर व देशाबाहेर चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य व स्वराज्याप्रती असलेले प्रेमाला पुन्हा एकदा प्रकर्षाने उजाळा मिळाला आहे. या चित्रपटातील विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिकेतील कामाला विशेष पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सहकलाकार म्हणून शिराळ्याचा सागर वसंत रसाळ चमकला आहे.सागर रसाळ सामान्य कुटुंबातील युवक. उपाहारगृह व्यवस्थापन (हॉटेल मॅनेजमेंट) शिक्षण घेऊन गोवा राज्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीस आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सागरने नोकरीबरोबर अभिनय जोपासला. कोल्हापुरात एका खासगी संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरचित्रवाणीवरील मराठी मालिकेतील कामाबरोबर लघु चित्रपटातील काम केले. विश्वासघात, चिताड, स्वच्छता अभियान, फ्रेंडशीप, लव्हशिप, टमरेल, आदी लघुचित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी तो जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडपडत आहे. आजवर त्याने अभिनय क्षेत्रात चांगलाच प्रवास केला आहे. मराठी चित्रपट ७, हिंदी, दाक्षिणात्य व हॉलिवूड प्रत्येकी एक, मराठी मालिका ८, लघु चित्रपट ७, हिंदी मालिका १ अशा भूमिका साकारल्या आहेत. यातून त्याच्याजवळील अभिनयाची धडपड लक्षात येते.

मालिकांतील भूमिका ‘जीव तुझ्यात गुंतला’ ‘शेतकरी नवरा’, ‘आभाळाची माया’ मालिकेत न्यायाधीशाची भूमिका, ‘सुंदरी’ मालिकेत ‘पोलिस उपनिरीक्षक’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘गजानन महाराज’ मालिकेत सावकाराची भूमिका, ‘आभाळाची माया भाग-२’ मध्ये डॉक्टर, ‘मिट्टी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत भूमिका त्याने साकारल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीChhaava Movie'छावा' चित्रपटshirala-acशिराळा