शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

शिराळ्यातील व्यापाऱ्यांचा उद्याच्या बंदला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:34 AM

शिराळा : वस्तू आणि सेवा कर कायद्यातील (जीएसटी) जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सै (कैट) कडून शुक्रवार ...

शिराळा : वस्तू आणि सेवा कर कायद्यातील (जीएसटी) जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सै (कैट) कडून शुक्रवार दि. २६ रोजी देशव्यापी व्यापार बंदचे आवाहन केले आहे. त्यास शिराळा तालुका व्यापारी संघटना व शिराळा व्यापारी महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक विशाल पाटील, मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यावसायिकांचे काम सोपे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जीएसटी कायद्‌यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये शंभरवेळा सुधारणा झाल्यामुळे ही करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची ठरत आहे. अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. या कायद्यानुसार थोडीशीसुद्धा चूक झाली, तर भरमसाट दंडाची तरतूद केली जाते. याच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आवाहनानुसार शिराळा तालुक्यातील व शहरातील संपूर्ण व्यापार बंद राहील.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, ‘कैट’चे प्रदेश सचिव अविनाश चितुरकर, चंद्रकांत जाधव, विश्वास कदम, सचिन शेटे, उद्धव खुर्द, दस्तगीर अत्तार, निसार मुल्ला, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.