शिराळ्यात रब्बी पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST2021-07-01T04:20:17+5:302021-07-01T04:20:17+5:30

शिराळा : शिराळा तालुका कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेचा विभागीय स्तर आणि ...

Shirala rabbi crop results announced | शिराळ्यात रब्बी पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

शिराळ्यात रब्बी पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

शिराळा : शिराळा तालुका कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेचा विभागीय स्तर आणि तालुका स्तरावरील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. गहू आणि रब्बी ज्वारीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विभागीय स्तरावर रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत राजाराम पांडुरंग पाटील (रेड) यांनी तृतीय क्रमांक, तालुका स्तरावर प्रथम क्रमांक सर्जेराव रामचंद्र पाटील (कापरी), द्वितीय क्रमांक शंकर भिवाजी खोत (कुसाईवाडी) आणि तृतीय क्रमांक तानाजी यशवंत जाधव (चिंचोली) यांना मिळाला आहे. गहू पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक माणिक सर्जेराव दशवंत (मांगले), द्वितीय क्रमांक दत्तात्रय ईश्वरा दशवंत, (मांगले) आणि तृतीय क्रमांक संभाजी सखाराम नांगरे (मांगले) यांना मिळाला आहे. तालुका कृषी अधिकारी गणपती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Shirala rabbi crop results announced