कवलापुरात दुकान फोडून ४५ हजाराचा माल लंपास

By Admin | Updated: November 6, 2015 23:55 IST2015-11-06T23:50:26+5:302015-11-06T23:55:28+5:30

शुक्रवारी पहाटे पाच वाजता चोरीचा प्रकार उघडकीस

Shipping from Shop in Kawalpur, 45 thousand goods lumpas | कवलापुरात दुकान फोडून ४५ हजाराचा माल लंपास

कवलापुरात दुकान फोडून ४५ हजाराचा माल लंपास

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील आझाद चौकातील विजय रामकृष्ण पाटील यांचे सिद्धेश्वर पान शॉप हे दुकान फोडून चोरट्यांनी ३६ हजाराची रोकड, साडेनऊ हजाराचे सिगारेटचे बॉक्स असा ४५ हजाराचा माल लंपास केला आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
पहिल्या बस स्थानकाजवळ आझाद चौक आहे. पाटील गुरुवारी रात्री अकरा वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरने दुकानाचा कोयंडा कापून आत प्रवेश केला. ड्रॉव्हरमधील ३६ हजाराची रोकड व महागड्या साडेनऊ हजाराच्या सिगारेटचे बॉक्स लंपास केले.
पाटील शुक्रवारी पहाटे पाच वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले, त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी सांगली पोलीस दलातील श्वानपथकास पाचारण केले होते. पण श्वान पाटील यांच्या दुकान परिसरातच घुटमळले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक गुन्हेगारांनीच पाळत ठेवून ही चोरी केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुपारी पाटील यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shipping from Shop in Kawalpur, 45 thousand goods lumpas