शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 14:40 IST

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी खा. पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडले होते

शिरढोण : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे गटाच्या शीतल अजय पाटील यांनी रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात प्रवेश केला. तशी छायाचित्रे सोमवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली. खा. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी खा. पाटील व त्यांच्या पत्नी ज्योतीताई, नगरसेवक अजित माने व रणजित घाडगे यांची भेट घेतली.फेब्रुवारीत झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक निवडून येऊन एकहाती सत्ता आली होती. मात्र आता २१ तारखेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी खा. पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडत बरोबरी केली. खा. पाटील आणि घोरपडे, सगरे यांच्या शेतकरी विकास आघाडी मधून घोरपडे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले होते. नगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन तीन दिवस होऊन गेले असताना घोरपडे गटाच्या शीतल पाटील यांनी रविवारी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात प्रवेश केला.खा. पाटील यांनी राष्ट्रवादी नंतर आता घोरपडे गटाला देखील डिवचल्याने घोरपडे व खा. पाटील यांच्यात नवा संघर्ष बघायला मिळणार आहे.

कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी आम्हाला ज्या हेतूसाठी निवडून दिले आहे, तो साध्य होण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. प्रभागमध्ये विकासकामे व्हावीत, नागरी प्रश्न मार्गी लागावेत या हेतूने कार्यकर्त्यांच्या सहमतीने भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी खासदार गटात प्रवेश केला आहे. - शीतल पाटील, नगरसेविका, कवठेमहांकाळ.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा