शरद पवार यांची बंदिस्त पाइप लाइन प्रकल्पास लवकरच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:38+5:302021-07-16T04:19:38+5:30

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती दिनानिमित्त व क्रांती वीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आटपाडी येथील माणगंगा कृषी विद्यालयाच्या ...

Sharad Pawar's visit to the closed pipeline project soon | शरद पवार यांची बंदिस्त पाइप लाइन प्रकल्पास लवकरच भेट

शरद पवार यांची बंदिस्त पाइप लाइन प्रकल्पास लवकरच भेट

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती दिनानिमित्त व क्रांती वीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आटपाडी येथील माणगंगा कृषी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित ऑनलाइन मेळाव्यात ते बोलत होते. आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने याबद्दल हा विजयी मेळावा घेण्यात आला होता.

डॉ. पाटणकर म्हणाले, या समन्यायी बंदिस्त पाइप लाइन पथदर्शक प्रकल्पाची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. देशामध्ये कुठेही असा प्रयोग झाला नाही. शेतीच्या पाण्याचे देशपातळीवर नियोजन करताना हा प्रकल्प मार्गदर्शक आणि क्रांतिकारक ठरणार आहे. त्यामुळे पथदर्शक प्रकल्प लवकर पूर्ण करून संपूर्ण राज्यात त्याचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेसाठी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत त्यांच्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन योजना मंजूर करणारे माजी मंत्री आर. आर. पाटील यांचेही योगदान असल्याचे यावेळी पाटणकर यांनी सांगितले.

आनंदराव पाटील म्हणाले, तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आली पाहिजे, पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, असा चळवळीचा वज्र निर्धार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी सुशांत देवकर, के. जे. जॉय, जयंत निकम, सादिक खाटीक, गणेश बाबर, अनिता पाटील, राजाराम मरगळे यांची भाषणे झाली.

यावेळी भारत पाटील, विलास शिंदे, महादेव देशमुख, दत्ता यमगर, सुजाता टिंगरे, सरिता भगत, नेहा भडभडे, राजेंद्र सावंत, भाऊसाहेब लिंगडे, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते. मनोहर विभुते यांनी स्वागत केले. विजय पुजारी यांनी आभार मानले.

Web Title: Sharad Pawar's visit to the closed pipeline project soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.