शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा, पवारांचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 10:07 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे.

सांगलीः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. इस्लामपुर - वाळवा मतदारसंघातून काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या जाहीर सभेला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी शरद पवारांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.शरद पवार म्हणाले, राजकारणात विरोधकांना नाउमेद करण्याचे काम होत आहे. मी शिखर बँकेचा डायरेक्टर किंवा सभासद नसतानाही ईडीच्या गुन्हेगारी यादीत माझं नाव आलं. अहो आमच्या बापजाद्यानेही कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बँकेत 70 जणांचा समावेश आहे. त्यात भाजपा, सेना यांचीसुद्धा लोक आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही, अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत, असं म्हणत  शरद पवार फडणवीस सरकारला थेट आव्हान दिलं आहे.  

गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मोठया उद्योगपतींनी जी कर्ज थकवली आहेत त्यामुळे अनेक बॅंका अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने 86 हजार कोटी रुपये त्या बॅंकांमध्ये भरले आहेत. आज देशात आणि राज्यात त्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल शरद पवार यांनी जनतेला केला.देशाच्या समोरचे महत्वाचे प्रश्न कोण मांडायला तयार नाही. निव्वळ 370 कलम, काश्मीरमध्ये काय काय केले, पुलवामा सांगतात. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन भावनेला हात घालत आहेत. अतिरेकी कारवायांचा खात्मा करा. आमचा पाठिंबा आहे. जगात सुंदर काश्मीर आहे. गुलामनबी आझाद यांनी आज निवेदन दिल्याचे सांगतानाच काश्मीरमध्ये शांतता आहे ठिक आहे परंतु ती स्मशानशांतता आहे. दुकाने, व्यापार बंद आहेत. घरं कशी चालवायची ही चिंता तिथल्या लोकांना सतावत आहे. रस्त्यावर कोण फिरणार नाही हे बघणं म्हणजे आम्ही खुप काही कर्तृत्व केलं हे सांगणं योग्य नाही, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसislampur-acइस्लामपूर