शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:27 IST

आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार

आटपाडी : शरद पवार नावाच्या जातीयवादी माणसानं आमचा घात केला. आजपर्यंत आमचे श्रद्धास्थान असलेल्या चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न करणारे पवार आज चौंडी आपल्या नातवाच्या ताब्यात देण्याचा डाव खेळत आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाचेही मोठे नुकसान केले, अशी जहरी टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनामध्ये रविवारी आयोजित दसरा मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानद पडळकर, माजी महापाैर संगीता खोत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पडळकर म्हणाले, आरेवाडीच्या बनामध्ये होत असणारा हा दसरा मेळावा वैचारिक परिवर्तनाचा मेळावा आहे. भविष्यात राजकीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू आरेवाडी होणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील एका नेत्याने मेळाव्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आमचे वैचारिक शत्रू आहेत. मराठा समाजालासुद्धा त्यांनी फसवले. यांना फक्त आपल्या जवळची माणसे मोठी करायची आहेत. यांना बहुजनांचा पोरगा मोठा झालेला चालत नाही. आतापर्यंत बहुजनांच्या जिवावर राजकारण करत त्यांनी बहुजनांचाच घात केला.

आरेवाडीचे बिरोबा बन म्हणजे हजारो वर्षांची संस्कृती आहे. हा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी येथे सांस्कृतिक विद्यालय सुरू करण्याचा संकल्प आहे.

शरद पवारांनी कधीही अहिल्यादेवी याची जयंती साजरी केली नाही; परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा अहिल्यादेवी यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्र समोर मांडतो, तेव्हा या पवार कुटुंबाला राजमाता अहिल्यादेवींची आठवण झाली. मग जयंती व पुतळा अनावरणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, आजचा तरुण शिकला आहे. तो जाणकार आहे. त्याच्या मनामध्ये परिवर्तनाची लाट उसळली आहे.

यावेळी माऊली हलवनकर, वसंतराव कोळेकर, ढालगावचे माजी सरपंच सुभाष संकेत काळे, अजित मासाळ, बापूसाहेब मेटकरी, सुरेश घागरे, सुभाष मस्के, दादासाहेब लवटे, अजित एडगे उपस्थित होते

आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार

आज या बिरोबाच्या बनामध्ये होत असलेल्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आयटी सेललासुद्धा येथे चोवीस तास लक्ष ठेवावे लागत आहे. भविष्यात आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार