शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

By अशोक डोंबाळे | Published: November 29, 2023 04:49 PM2023-11-29T16:49:38+5:302023-11-29T16:49:59+5:30

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई ...

Shambhuraj Desai should not Don reduce Koyna water, Krishna Flood Control Committee demands | शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

शंभुराज देसाई यांनी कोयनेच्या पाण्यात कपात करू नये, कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

सांगली : कोयना धरणात आजही ८० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याचे सांगून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी मंत्रिपदाचा वापर करून प्रशासनावर दबाव आणणे थांबवावे, अन्यथा सांगलीची जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शंभुराज देसाई यांच्या भूलथापा खपवून घेणार नाही. सातारा येथे झालेल्या बैठकीमध्ये पाणी कपात प्रस्तावित केली आहे. पिण्याच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी तर वीज निर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली तर राज्याला भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.

१९६३ पासून सांगली जिल्ह्याचा कृष्णा नदीवरील ३७.५० टीएमसी पाण्यावर हक्क आहे. असे असतानाही पाणी कपात कशासाठी? अजूनही धरणामध्ये १३.५० टीएमसी पाणीसाठा अतिरिक्त आहे. असे असतांना पाणी कपात करू नये. सांगली पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे कृष्णा नदी कोरडी पडत आहे. जलसंपदा विभागाने बरगे न घातल्यामुळेही पाणी वाया जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सांगलीकरांना वेठीस धरु नये

सिंचन, बिगर सिंचन औद्योगिक, पिण्यासाठी सांगली जिल्ह्याला ३७.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. ते देणे प्रशासनाला बंधनकारकच आहे. असे असताना चुकीची माहिती देत मुख्य अभियंता ही लोकांची दिशाभूल करत आहेत. वीज निर्मितीसाठी दहा टीएमसी पाणी कमी पडेल, त्यासाठी २२६ कोटींची तरतूद शासनाने करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्य अभियंता यांनी आग्रह धरण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून सांगलीकरांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावेत, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही सर्जेराव पाटील यांनी दिला.

मंत्री म्हणतात पाणी वापर मर्यादित करा

साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वापराच्या नियोजनाबाबत बैठक झाली आहे. या बैठकीत कोयना धरणातून रब्बी व उन्हाळ्यात सिंचन व वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर मर्यादित करा, असे आदेश दिल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे अधिकारी सांगत आहेत. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यावर अन्याय होणार असल्याचे सर्जेराव पाटील म्हणाले

Web Title: Shambhuraj Desai should not Don reduce Koyna water, Krishna Flood Control Committee demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.