कुंडलवाडीत सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:41+5:302021-05-07T04:27:41+5:30
तांदुळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील मुख्य संभाजी चौकातील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना व वाहनधारकांना नाहक ...

कुंडलवाडीत सांडपाणी रस्त्यावर
तांदुळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील मुख्य संभाजी चौकातील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याचा नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रस्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या चुकीने या चौकातून जाणारे गावातील गटारीचे सांडपाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला नाही. चुकीच्या नियोजनामुळे गटारीचे सांडपाणी संपूर्ण मुख्य संभाजी चौकातील रस्त्यावर येत आहे. सध्या उन्हाळ्यात रस्त्यावर पाणी येत असेल, तर पावसाळ्यात काय स्थिती होईल, याचा विचार न करणेच बरे, अशी नागरिकांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
याबाबत सरपंच रहिमशा शक्कर फकीर यांनी सांगितले की, या चौकातील गटारीचे सांडपाणी व्यवस्थित बाहेर पडावे यासाठी जेसीबीच्या साहाय्याने पाईप्स घालण्यात आल्या आहेत. पण त्या पाईप्स प्रत्येकवर्षी खराब होतात. तसेच या परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचरा गोळा करून गटारीत टाकतात. यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. पण ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.