शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Sangli: कट रचला एकाविरूद्ध अन् ‘गेम’ केली दुसऱ्याची; हरिपूर येथे वेटरचा खूनप्रकरणी सात संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:15 IST

सांगली : तो पुण्याहून आल्याची खबर मिळाली. पूर्वीचा राग धुमसत असल्याने काटा काढायचे ठरवले. संशयित मध्यरात्री दुचाकीवरून मारण्यासाठी निघाले. ...

सांगली : तो पुण्याहून आल्याची खबर मिळाली. पूर्वीचा राग धुमसत असल्याने काटा काढायचे ठरवले. संशयित मध्यरात्री दुचाकीवरून मारण्यासाठी निघाले. यावेळी वाटेत एकजण आडवा आला. त्याच्याशी खटका उडाल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. हरिपूर (ता. मिरज) येथील मठासमोर मध्यरात्री हा प्रकार घडला.तब्बल २४ वार झाल्यामुळे हॉटेलमधील वेटर सुरज अलिसाब सिद्धनाथ (वय ३२, रा. पवार प्लॉट, हरिपूर रस्ता) हा जागीच मृत झाला तर ज्याची ‘गेम’ होणार होती तो सुदैवाने बचावला. या खूनप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.मृत सुरज याचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील बनहट्टी येथील आहेत. अनेक वर्षांपासून कुटुंब सांगलीत पवार प्लॉट परिसरात राहते. सुरज याचे लग्न झाले असून, तो अंकली येथील वीटभट्टीवर काम करत होता तर सायंकाळनंतर हरिपूर येथे हॉटेल संगममध्ये वेटरचे काम करत होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला होता. मध्यरात्री एका मित्राने त्याला जेवण पार्सल घेऊन येण्यास सांगितले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास सुरज दुचाकी (एमएच १० एएन २२३२) वरून घराकडे येत होता.संशयित युवक याचवेळी हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते. सुरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारल्याच्या शुल्लक कारणातून वाद झाला. संशयितांनी पुढे जाऊन हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ त्याला अडवले. त्याच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर सुरज जीव वाचवण्यासाठी हरिपूरच्या दिशेने पळू लागला. काही अंतरावर एका घरासमोर तो कोसळला. तेथे गाठून हल्लेखोरांनी पुन्हा वार केले. रक्तस्त्राव होऊन सुरजचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, सुरज जेवणाचे पार्सल का घेऊन आला नाही म्हणून मित्राने एकाला हॉटेलकडे पाठवले. त्याला वाटेत सुरज मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याने हा प्रकार सुरजच्या घरी सांगितला. खुनाची माहिती मिळाल्यानंतर सांगली ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही धावले. मृतदेहाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिलमध्ये मृतदेह पाठवला. सुरजवर २४ वार झाले आहेत. सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली.

अल्पवयीन चौघांसह सात ताब्यातसुरजच्या खुनानंतर ग्रामीण पोलिस, गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलिसांनी सूत्रे हलवली. बुधवारी सायंकाळपर्यंत सात जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी चौघे अल्पवयीन असून, तिघे सज्ञान आहेत. अल्पवयीनपैकी एक सराईत गुन्हेगाराचा मुलगा आहे तर एका अल्पवयीन युवकावर हाफ मर्डरचे तीन गुन्हे दाखल आहेत.

आठवड्यात वेटरचा दुसरा खूनसांगलीत सिव्हिल हॉस्पिटलजवळ कोकणातील वेटर शैलेश राऊत याचा खून झाला होता. त्यानंतर सुरज सिद्धनाथ याचा खून झाला. आठवड्यात दोन वेटरचे खून झाल्याने याची चर्चा रंगली आहे.

सुदैवाने तो बचावलाहरिपूर रस्ता परिसरातील स्वप्निल नामक तरुणाचा संशयितांशी वाद झाला होता. स्वप्निलने एकाला मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्यावर राग होता. स्वप्निल पुण्यात नोकरीस होता. तो सांगलीत आल्याचे समजताच खुनाचा कट रचला. परंतु, वाटेत सुरजशी वाद झाल्यामुळे त्याचाच खून केला. स्वप्निल सुदैवाने बचावला. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस