नेर्ले (ता. वाळवा) येथे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. रावसाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. मोहिते म्हणाले की, कृष्णा कारखाना सर्वांच्या मालकीचा ठेवूया. त्याला खासगीकरणापासून वाचविण्यासाठी संस्थापक पॅनेलच्या पाठीशी मतदान करून उभे रहा. सत्ताधाऱ्यांनी ठरविलेल्या अक्रियाशील सभासदांना पुन्हा मतदानाचा हक्क न्यायालयाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना बसलेली ही पहिली चपराक आहे.
संचालक सुभाष पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बी. एन. पाटील, अशोक मोरे, संजय पाटील, राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, अजित पाटील-चिखलीकर, उदयसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश पाटील यांनी आभार मानले. यावेळी किसन पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश सावंत, वसंतराव पाटील, जालिंदर पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.