आष्ट्याच्या श्री चॅरिटेबल ट्रस्टला ‘सेवारत्न’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:04+5:302021-01-08T05:26:04+5:30

आष्टा : येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टला मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक मंडळ ‘सेवारत्न’ पुरस्कार देऊन ...

‘Sevaratna’ award to Shri Charitable Trust of Ashta | आष्ट्याच्या श्री चॅरिटेबल ट्रस्टला ‘सेवारत्न’ पुरस्कार

आष्ट्याच्या श्री चॅरिटेबल ट्रस्टला ‘सेवारत्न’ पुरस्कार

आष्टा :

येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टला मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक मंडळ ‘सेवारत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

संस्थेचे संस्थापक प्रदीप पाटील म्हणाले, संस्थेने आष्टा शहरातील मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करून ती जगवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप तसेच गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे.

प्रदीप पाटील, अध्यक्ष महेश गुरव, डॉ. एन. डी. सांगले, डॉ. प्रकाश आडमुठे, अभिनंदन पाटील, अभिजित कुलकर्णी, सचिन दमामे, विश्वजित सांभारे, सुरेंद्र शिराळकर, अमोल तांबवेकर, राहुल आवटी, मनोज मासाळ, दिलीप कोरे, अतुल महाजन, संतोष जोशी, प्रसाद ताडे, कुबेर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो-०४आष्टा१

फोटो : आष्टा येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टला मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने आदर्श सामाजिक संस्था म्हणून गौरवण्यात आले.

Web Title: ‘Sevaratna’ award to Shri Charitable Trust of Ashta