सामान्य जनतेची सेवा करा, समाज त्याची उतराई करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:06+5:302021-09-26T04:29:06+5:30

कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी आमदार नीलेश लंके यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ ...

Serve the common people, society will bring it down | सामान्य जनतेची सेवा करा, समाज त्याची उतराई करेल

सामान्य जनतेची सेवा करा, समाज त्याची उतराई करेल

कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी आमदार नीलेश लंके यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी. एस. देशमुख, बाळासाहेब वत्रे उपस्थित होते.

लंके म्हणाले, लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक तसेच कुटुंब प्रमुख असतो. याच भूमिकेतुन मायबाप जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मी ११०० बेडचे कोरोना सेंटर सुरू केले. ते करीत असताना सुरुवातीला पैसे नव्हते. परंतु, नंतर लोकांनी लाखो रुपयांची मदत केली. येथील आमचे काम पाहून देशभरातूनच नव्हे, तर फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस, आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आली. त्यामुळेच आम्ही उभारलेल्या कोरोना सेंटरमधून २५ हजारांवर लोकांना काेराेनामुक्त करू शकलो. विशेष म्हणजे येथे दाखल झालेल्या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झाला नाही. औषधोपचार व केवळ आधार देऊन लोकांना कोरोनामुक्त केले. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालविण्यासाठी योगा, सकस आहार, व्यायाम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. तसेच भजन, कीर्तन, ऑर्केट्रा, तमाशा, आदी कार्यक्रम घेऊन लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालविली. मनापासून काम केल्यानेच कोरोनाशी दोन हात करू शकलो. त्यासाठी हजारो लोकांचे मदतीचे हात मिळाले.

यावेळी जिल्हा राष्ट्रवादीचे चिटणीस जगदीश महाडिक, युवकचे अध्यक्ष विराज पवार, शहराध्यक्ष परवेज तांबोळी, माउली देशमुख, वैभव देसाई, संदीप काटकर, सागर लाटोरे, रमेश जाधव, नाथा गुरव, संभाजी चव्हाण, दादासाहेब नलवडे, राहुल चन्ने, आदी उपस्थित होते.

फोटो : २५ कडेगाव ३

ओळी : कडेगाव येथे आमदार नीलेश लंके यांचे डी. एस. देशमुख, बाळासाहेब वत्रे, माउली देशमुख यांनी स्वागत केले.

Web Title: Serve the common people, society will bring it down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.