शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी तरुणींच्या प्रकरणाची पोलिस प्रमुखांकडून गंभीर दखल, वेश्या व्यवसाय रॅकेटचा होणार पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:16 IST

बांगलादेशपासून सांगलीपर्यंत साखळी

सांगली : नोकरीच्या आमिषाने बांगलादेशातून तरुणींना सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात सामील असलेल्या प्रत्येकावर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  बांगलादेशातील तरुणींना हेरून त्यांना भारतात नोकरीच्या आमिषाने आणून आर्थिक व्यवहार केला जातो. नंतर त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो. सांगलीतील गोकुळनगर, स्वरूप टॉकिज परिसर येथील वेश्या व्यवसायातील काही घरमालकिणींनी त्यांना बनावट आधार कार्ड तयार करून दिले आहे. छाप्यात या तरुणी सापडल्याच तर असे आधार कार्ड पुढे करून त्यांना सोडवले जाते. हे संपूर्ण प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले आहे.पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत यात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच तरुणींची पिळवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.पोलिस प्रमुखांच्या सुचनेप्रमाणे आता सांगलीतील पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांनी प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.रॅकेटचा होणार पर्दाफाशबांगलादेशमधून नोकरीच्या आमिषाने भारतात तरुणींना आणत त्यांना थेट वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. यासाठी बांगलादेशपासून सांगलीपर्यंतची साखळी कायम आहे. याचविरोधात आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे. कारवाईच्या भीतीने या तरुणींना अन्यत्र हलविण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून कारवाई झाल्यास या संपूर्ण रॅकेटचा आता पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :SangliसांगलीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस