सेल्फी पॉईंटमुळे शहराच्या वैभवात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST2021-03-26T04:25:25+5:302021-03-26T04:25:25+5:30

आष्टा येथे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन प्रकाश रुकडे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी धैर्यशील शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा ...

Selfie points add to the splendor of the city | सेल्फी पॉईंटमुळे शहराच्या वैभवात भर

सेल्फी पॉईंटमुळे शहराच्या वैभवात भर

आष्टा येथे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन प्रकाश रुकडे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी धैर्यशील शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, दीपक धोटे, दत्तराज हिप्परकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील वैभवदादा युवा मंचच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रूकडे स्वागत कमानीजवळ ‘आय लव्ह आष्टा’ या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आष्टा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश रूकडे, आता शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याहस्ते झाले.

प्रकाश रुकडे म्हणाले, आष्टा शहरात स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान पालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. शहरात मुख्य मार्गावर नागरिकांच्यासाठी सेल्फी पॉईंट शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरत आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे, धैर्यशील शिंदे, दीपक थोटे, दत्तराज हिप्परकर, शिरीष पवार, बाबासाहेब सिद्ध, पी. एल. घस्ते, अर्जुन माने, विकास बोरकर, बाबा रुकडे, सतीश माळी, प्रभाकर जाधव, राजू अत्तार, वरदराज शिंदे, सागर जगताप, राजू शिंदे, संकेत पाटील, नारायण वायदंडे, अमर शेळके, इंद्रजित हिरुगडे, कांचन हिरुगडे उपस्थित होते.

Web Title: Selfie points add to the splendor of the city