करोली टीच्या उपसरपंच वैशाली चव्हाण यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST2021-03-21T04:26:00+5:302021-03-21T04:26:00+5:30

फोटो ओळ : करोली टी (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन उपसरपंच वैशाली चव्हाण यांचा प्रशांत शेजाळ यांनी सत्कार केला. यावेळी ...

Selection of Karoli T's Deputy Panch Vaishali Chavan | करोली टीच्या उपसरपंच वैशाली चव्हाण यांची निवड

करोली टीच्या उपसरपंच वैशाली चव्हाण यांची निवड

फोटो ओळ : करोली टी (ता. कवठेमहांकाळ) येथील नूतन उपसरपंच वैशाली चव्हाण यांचा प्रशांत शेजाळ यांनी सत्कार केला. यावेळी सरपंच अशिका पवार उपस्थित होत्या.

कवठेमहांकाळ : करोली टी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली. ही निवड सांगली बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

उपसरपंच वैशाली चव्हाण यांचे प्रशांत शेजाळ यांनी अभिनंदन केले. वैशाली चव्हाण म्हणाल्या की गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देईन.

यावेळी सरपंच अशिका पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हिंमत पाटील, म्हैशाळचे सरपंच शहाजी ऐडके, शशिकांत जगताप, अरविंद मोरे, भीमराव पाटोळे, विशाल पाटोळे, नंदकुमार कर्पे, सचिन वायदंडे, सुभाष पवार, समशेर तांबोळी, राजाराम तोडकर, डाॅ. रायदा गिड्डे, संतोष जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Selection of Karoli T's Deputy Panch Vaishali Chavan