शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली, मिरज स्थानक संवेदनशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:40 IST

कर्मचाऱ्यांना ड्युटीवर शस्त्र बाळगण्याचे आदेश

सांगली : पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून रेल्वेनेही सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे विभागात धावणाऱ्या २४ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.विशेषतः पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. तेथे अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पुण्यासह मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर श्वानपथकांद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना शस्त्र बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा बलाचे निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहेत. संवेदनशील बाबीची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला दिली जात आहे. रात्रीच्या वेळी एक निरीक्षक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. विविध स्थानकांवर व गाड्यांमध्ये साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांकडून 'रेल मदत' या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या तक्रारींची नियमितपणे दखल घेतली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरज स्थानक संवेदनशीलसुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मिरज रेल्वेस्थानकही संवेदनशील आहे. या स्थानकात यापूर्वीही अनेकदा गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेकदा गुन्हेगारी कारवाया, लुटमारी झाल्या आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहे.

टॅग्स :SangliसांगलीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाrailwayरेल्वेPoliceपोलिसmiraj-acमिरज