शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय

By श्रीनिवास नागे | Updated: May 16, 2023 15:02 IST

मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल. 

मिरज : सिकंदराबाद ते कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे दि. ३ जूनपासून आठवड्यातून एकदा सुरू होणार आहे. या विशेष रेल्वेमुळे दक्षिण भारतात जाणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष रेल्वे दर शनिवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सिकंदराबाद येथून सुटेल. वाडी येथे रात्री अकरा वाजता, कलबुर्गी य़ेथे रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी, कुर्डूवाडी येथे रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी, मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल. 

ती परतीच्या प्रवासासाठी कोल्हापुरातून रविवारी सायंकाळी सहा वाजता सुटणार आहे. मिरजेत सायंकाळी सात वाजता, कुर्डूवाडी येथे रात्री अकरा वाजता, कलबुर्गी येथे पहाटे तीन वाजता, वाडी येथे पहाटे सव्वाचार वाजता व सिकंदराबाद येथे सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजता पोहोचेल. विशेष रेल्वेच्या दि. ३ ते २४ जून या कालावधीत चार फेऱ्या होणार आहेत. सध्या बेळगावातून सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीला अठरा तास लागतात. मात्र सोलापूरमार्गे ध‍ावणाऱ्या या विशेष रेल्वेला १४ तास लागणार असल्याने वेळेची बचत होणार आहे. विशेष रेल्वेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे नियमित सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेhyderabad-pcहैदराबाद