शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

 हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 16:40 IST

Teacher Sangli : जिल्हातील शिक्षणाधिकारी व पे युनिट अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे एप्रिल महीना संपत आला तरी माधामिक शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे पगार अदयाप झालेले नाहीत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर माने यांनी केला आहे.

ठळक मुद्दे हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवरशिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांचा आरोप

संजयनगर/सांगली : जिल्हातील शिक्षणाधिकारी व पे युनिट अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे एप्रिल महीना संपत आला तरी माधामिक शाळातील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे पगार अदयाप झालेले नाहीत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुधाकर माने यांनी केला आहे.शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे सांगली जिल्हातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ऐन पाडवा, रामनवमी आणि रमजान महिना सूरू असून सणाच्या काळात शिक्षकांना पगाराविना दिवस काढावे लागत आहे. अनेक शिक्षक कोरोना ड्युटी करत आहेत.अनेकजण कोरोनाबाधित आहेत, आणि उपचार घेत आहेत. कांहीजण होम कोरंटाईन झाले आहेत, अशा बिकट परिस्थितीत हे शिक्षक पगाराविना मानसिक ददडपणाखाली जगत आहेत. कर्जावरचे व्याज न भरल्याने अनेकांना दंड भरावा लागत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप माने यांनी केला आहे. 

शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु भगिनी यांच्या सहनशक्तीचा अंत न पहाता कार्यालयाने आपल्या कामात सुधारणा करावी आणि शिक्षकांचे पगार वेळेत महिन्याच्या एक तारखेस करावेत, अशी मागणी डॉ. आशिष यमगर, संजय पवार, रतन कुंभार, अरीफ गोलंदाज, सुरेश सपकाळ, बाजीराव जाधव, देवेंद्र पाटील, सुरेश कदम, किशोर वाघमारे, शहाजी खरमाटे, प्रविण पवार, दिपक सपकाळ, संतोष चौगुले, दिपक पाटील, तानाजी पवार, मुरारी माने, दिपक चौधरी या शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

एप्रिल महिन्याची २२ तारीख उलटून गेली तरी अदयाप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग व वित्त विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिल नाकारली आहेत. या बाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहिले आहे, परंतू अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.-सुभाष मोरे, राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक भारती.

टॅग्स :Teacherशिक्षकSangliसांगली