शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
4
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
5
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
6
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
7
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
8
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
9
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
10
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
11
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
12
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
13
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
14
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
15
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
16
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
17
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
18
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
19
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
20
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीतून सहली निघाल्या, सांगली आगाराला फायदा झाला; तिजोरीत किती लाखांची पडली भर..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:35 IST

३ महिन्यांत १३४ लालपरीतून घडवली विद्यार्थ्यांना आनंद यात्रा

प्रसाद माळीसांगली : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शैक्षणिक सहली या केवळ सरकारी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसने घेऊन जाणे बंधनकारक केले आहे. तसेच, परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नव्या कोऱ्या एसटी बस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा चांगलाच फायदा सांगली आगाराला झाला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालवधीत गेलेल्या शैक्षणिक सहलीतून सांगली आगाराच्या तिजोरीत तब्बल २१ लाख ७१ हजार ८४० रुपयांची भर पडली आहे.दिवाळीनंतर सर्व शाळांच्या शैक्षणिक सहलींना प्रारंभ होतो. गड, किल्ले, निसर्गरम्य समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे, संग्राहलये, विविध मंदिरे, विविध पर्यटन ठिकाणी शालेय सहली जातात. शिक्षण विभागाच्या नव्या नियमांमुळे आता एसटी महामंडळाची बसद्वारे सहली घेऊन जाणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सहलींसाठी शाळांशी होणाऱ्या प्रासंगिक कराराद्वारे एसटी महामंडळांकडून ५० टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने अनेक शाळांच्या सहली या लालपरीतून जात आहेत. सहलीच्या माध्यमातून सांगली आगारास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत २१ लाख ७१ हजार ८४० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात २९ करार झाले होते. तर, तीन महिन्यांत १३४ बसद्वारे सहली गेल्या, तर ५२ हजार २५ किलोमीटर इतके एसटीची चाके फिरली. या सहलीचे नियोजन सागंली आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, शीतल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक प्रमुख महेश पाटील, लिपिक अविनाश तुपे यांनी केले.

महिना / करार / बस/ किलोमीटर/ उत्पन्नऑक्टोबर / ८ / १६ / ५७५० / २,२२,४००नोव्हेंबर / २१ / ४० / १५२६०/ ६,३७,४४०डिसेंबर / -- / ७८ / ३१०१५/ १३१२०००एकूण / -- / १३४/ ५२,०२५ / २१,७१,८४०

सांगलीतून सहली जाणारी प्रमुख ठिकाणे१. मार्लेश्वर - गणपतीमुळे - रत्नागिरी२. मालवण - सिंधुदुर्ग - कुणकेश्वर३. वाई - महाबळेश्वर- प्रतापगड- महाड- रायगड४. सातारा - सज्जनगड- ठोसेघर४. पुरंदर - जेजुरी - मोरगाव (गणपती)- नारायणपूर (प्रतिबालाजी)५. कोल्हापूर - पन्हाळा - जोतिबा - पावनखिंड

एसटी महामंडळाकडून शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. सांगली आगारातून सहलीसाठी नव्या लालपरी देण्यात येत आहेत. शाळांनी एसटी बसमधून सहली घेऊन जाव्यात, यासाठी आम्ही शाळांना भेटी देत आहोत. - शीतल माने, आगार व्यवस्थापक, सांगली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Depot Profits from School Trips on 'Lal Pari' Buses

Web Summary : Sangli depot earned ₹21.71 lakh in three months from school trips due to mandatory government bus use. Pratap Sarnaik's decision to provide new buses and 50% discounts boosted revenue, with 134 trips covering 52,025 kilometers.